शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (07:26 IST)

शिवनेरीवर आग्या मोळाच्या मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला

Agya Mola bees attack tourists on Shivneri
पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला पर्यटकांना नेहमीच  खुणावत असतो.  रविवारची सुट्टी असल्यानं अनेक पर्यटकांनी शिवनेरीवर आपला मोर्चा वळविला होता. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली. मात्र यावेळी  आग्या मोळाच्या मधमाशांनी त्या पर्यटकांना घेरलं. काही कळण्याआधीच त्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्या मधमाशांच्या चाव्याने अनेक पर्यटक जखमी झाले.
 
स्थानिक नागरिकांच्या मदतीने या सर्व जखमी पर्यटकांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील जे काही पर्यटक किरकोळ जखमी झाले. शिवनेरी किल्यावर सुमारे 250 हुन अधिक पर्यटक आले होते. यापैकी कुणीतरी मधमाशांच्या पोळ्यावर दगड भिरकावला. त्यामुळे त्या आग्या मोलाच्या माशा चिडल्या आणि त्यांनी गडावर असलेल्या पर्यटकांच्या दिशेने झेपावत त्यांचे चावे घेतले.