1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (21:15 IST)

'त्या' पुतळ्यावर बसवण्यात आलेल्या मेघडंबरीवरील फरशीचा एक तुकडा निखळला

A piece of pavement on the 'Meghadambari' placed on 'that' statue came out  'त्या' पुतळ्यावर बसवण्यात आलेल्या मेघडंबरीवरील फरशीचा एक तुकडा निखळलाMarathi Pune News  In Webdunia Marathi
पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी  झाले. मात्र  सोमवारी अर्थात दुसऱ्याच दिवशी या पुतळ्यावर बसवण्यात आलेल्या मेघडंबरीवरील फरशीचा एक तुकडा निखळला.काम अपूर्ण असताना केवळ प्रसिद्धीसाठी या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केलाय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी पुतळ्यासमोर घोषणाबाजी केली. 
 
दरम्यान, फरशीचा तुकडा महापालिकेचे कर्मचारी घेऊन जात असताना त्यांच्यासोबत या कार्यकर्त्यांची किरकोळ झटापटही झाली. हा पुतळा सध्या पडद्याआड झाकून ठेवण्यात आला आहे. क्रेनचा धक्का लागून फरशीचा तुकडा निखळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणण आहे.