सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2022 (18:02 IST)

पंतप्रधान मोदींनी पुण्याला मेट्रो रेल्वेची भेट दिली, विद्यार्थ्यांसह प्रवासाचा आनंद घेतला

पंत प्रधान मोदी यांनी रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर आले असता पुणे मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाचे उदघाटन केले . एकूण 32.2 किमी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी विभागाचे पंतप्रधान मोदींनी उदघाटन केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी स्टेशनवर पोहोचले आणि त्यांनी डिझिटल अँप वरून तिकीट खरेदी करून मेट्रो चा प्रवास केला. या दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी मेट्रोच्या डब्यात असलेल्या दिव्यांगांशी संवाद साधला. गरवारे स्थानकावरून मेट्रोमध्ये चढण्यापूर्वी मोदींनी तेथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या प्रदर्शनाची पाहणी केली. 
 
पंत प्रधान मोदी यांनी 24 डिसेंबर 2016रोजी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देखील केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 1,850 किलो 'गनमेटल' पासून बनवला असून उंची  सुमारे 9.5 फूट आहे.