शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (20:53 IST)

भुशी डॅम दुर्घटनेतील पाचवा मृतदेह सापडला

लोणावळा जवळ असलेल्या भुशी डॅम येथे रविवारी वर्षाविहार सहलीसाठी आलेल्या पुण्यातील हडपसर येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली असून पाच पैकी तीन मृतदेह रविवारी सापडले आज सकाळी चौथा मृतदेह सापडला. पाचव्या मृतदेहाचा शोध सुरु होता. आज दुपारी पाचवा मृतदेह सापडला. 

शाहिस्ता लियाकत अन्सारी(36), अमिमा आदिल अन्सारी(13), उमेश आदिल अन्सारी (8), अदनान सबाहत अन्सारी(4), मारिया अकील सय्यद(9) असे या मयतांची नावे आहेत. 
या मृतांपैकी शाहिस्ता, अमिमा, उमेश यांचे मृतदेह रविवारी सायंकाळी सापडले तर मारियाचे मृतदेह सोमवारी सकाळी सापडले. तर अदनानचे मृतदेह सोमवारीच दुपारी सापडले. 

अन्सारी कटुम्ब हे वर्षाविहार सहलीसाठी चार दिवसांपूर्वी या कुटुंबात लग्न होते. नवदांपत्यासह हे कुटुंब सहलीसाठी आले आणि भुशी डॅमला फिरायला गेले असता एका खडकावर नऊ जण बसलेले होते पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले मात्र त्यातील चौघांना वाचवण्यात यश आले. या मध्ये नवदांपत्याचा समावेश देखील होता.त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

तर पाच जण पाण्यात वाहून गेले. शिवदुर्ग संस्था लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ व आपदा मित्र मावळ यांना माहिती मिळाल्यावर ते घटनस्थळी पोहोचले आणि रविवारी त्यांनी पाण्यात वाहून गेलेल्या  पाचही जणांचा शोध घेण्यास सुरु केले. दोघांचे मृतदेह सापडले. रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा दोन्ही मृतदेहांची शोध सुरु झाली असता मारियाचा मृतदेह सकाळी सापडला तर अदनान चा मृतदेह आज दुपारी सापडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit