पुण्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक
पुणे पोलिसांनी रविवारी शहरातील कोंढवा परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी स्थलांतरितांना अटक केली. या कारवाईत लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजेंस (एमआय)चाही समावेश होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामध्ये काम केल्यानंतर या चौघांनी पुण्यात बांधकाम कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
तसेच परदेशी कायदा आणि पासपोर्ट कायद्याच्या कलमांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त केले आहे.
Edited By- Dhanashri Naik