शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (08:20 IST)

धरणात पोहण्यासाठी गेलेले चार विद्यार्थी बुडाले

पुण्यातील खेड तालुक्यात गुंडाळवाडी गावातून चासकमान धरण्यात पोहण्यासाठी गेलेले चार विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मयत विद्यार्थी गुंजाळवाडी गावातील तिवळी हिल येथील सह्याद्री इंटरनॅशल स्कूल चे होते. शाळेला सुट्टी लागणार म्हणून शाळेतील 34 विद्यार्थी शिक्षकांसह पोहण्याचा सराव करण्यासाठी चासकमान धरणाच्या जलाशयात गेले असता ही घटना घडली. तनिषा देसाई, रीतीन डीडी, परीक्षित अगरवाल, आणि नव्या भोसले अशी मृत्युमुखी मुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती खेड पोलिसांना देण्यात आली. ते घटनास्थळी पोहोचले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी कमरियापाण्यात उभे असता एक लाट आली आणि त्यात सहा ते सात विद्यार्थी पाण्यात ओढले गेले त्यांना वाचविण्यासाठी शिक्षकांनी आणि स्थानिक नागरिकांनी खूप प्रयत्न केले काही विद्यार्थींना पाण्यातून काढण्यात यश मिळाले पण हे चौघे खोल पाण्यात बुडाले. चार ही मृतक विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.