बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जानेवारी 2021 (09:23 IST)

वाचा, पत्नीला खूश करण्यासाठी तो 'हे' काम करायचा

पुण्यात पत्नीला मित्राचं साड्यांचं दुकान असल्याचं सांगून त्यानं 30 पेक्षा जास्त साड्या, ड्रेस गिफ्ट चोरले. रोहन सोनटक्के असं त्याचं नाव असून हा चोरटा वारजे परिसरात चोरीचा मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक केल्यानंतर 9 चोऱ्यांचा उलगडा झाला. त्याच्याकडून दोन मोटारी, एक दुचाकी, १८ मोबाईल, ३ लॅपटॉप, ३० साड्या, १२ ड्रेस असा १३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीला खुश करण्यासाठी एकाने चक्क साड्या आणि ड्रेस चोरले. रोहन सोनटक्के हा सराईत चोरटा पोलिसांची हाती लागला. त्यानंतर ही माहिती समोर आली.