शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (16:49 IST)

बाप्परे, पाण्याच्या हौदात सापडली मानवी कवटी, हाडे

पिंपरी-चिंचवड शहरातील बालाजी नगर येथे मानवी कवटीसह काही हाडे एका पाण्याच्या हौदात सापडली आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक शोध घेत आहेत.
 
“भोसरीच्या बालाजी नगर येथे मानवी शरीराच्या काही भागाची हाडे सापडली आहेत. त्यात मानवी कवटी आणि इतर भागांचा समावेश आहे. दोन मुलं सुलभ शौचालयाच्या हौदात मासे पकडत होते. तेव्हा, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत कवटीसह हाडे मिळाली आहेत. या घटनेचा तपास सुरु असून सापडलेली हाडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे यांनी दिली आहे.
 
हाडे बाहेरून आणून तिथे टाकल्याचा संशय पोलिसांना असून इतर हाडांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय परिसरात कोणी बेपत्ता आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे. तसेच या घटनेबाबत स्थानिकांकडे चौकशी केली जात आहे.