मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (16:45 IST)

शुभेच्छा देताना फडणवीस यांचा शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.  #BalasahebThackeray हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होत आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मात्र या शुभेच्छा देताना फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
 
“आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन..”, असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे. आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन.. pic.twitter.com/XdbnEApHTa.