शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (22:55 IST)

पतीचे जावेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्याच्या विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर परिसरातील घटना

पतीचे जावेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून पतीने पत्नीचा मानसिक छळ केला. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पती आणी जावेवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने बुधवारी आत्महत्या केली. हा प्रकार विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर येथे घडला. विमल असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती आणि जावेवर (विश्रांतवाडी) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी मयत विमल यांचे वडील रमेश दगडु मेढे (वय-65 रा. आळंदी रोड, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल यांचे 2005 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पतीने विमलच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच तो घरात सामान देखील देत नव्हता.पती आणि मयत विमलची जाऊ यांच्यात प्रेमसंबंध होते.त्यामुळे या दोघांनी विमलचा मानसिकव शारिरीक छळ केला.असा आरोप विमलच्या वडिलांनी केला आहे.दोघांच्या त्रासाला वैतागून विमलने 18 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली.पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस  करीत आहेत.