गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (10:54 IST)

पुण्यात किरकोळ वादातून कोयत्याने वार करत तरुणाचा खून

murder
पुण्यात मुळशी पॅटर्न  चित्रपटाचा थरार बघायला मिळाला असून पाठलाग करत किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करीत इमारतीच्या टेरेसवर मध्यरात्री तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना फरासखाना पोलीस ठाण्याच्या भागात गणेश पेठेत ओसवाल इमारतीत घडली आहे. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

सदर घटना गणेश पेठेतील ओसवाल इमारतीच्या टेरेसवर मध्यरात्री घडली असून आरोपी आणि मयत सिद्धार्थ यांच्यात वाद झाले. आरोपी कोयता घेऊन त्याचा मागे धावला. सिद्धार्थ जीव वाचविण्यासाठी ओसवाल इमारतीच्या टेरेसवर गेला. आरोपीने त्याला एकटे गाठून त्याचा निर्घृण खून केला. 

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  
 
 Edited by - Priya Dixit