सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (14:13 IST)

Pune : एकतर्फी प्रेमातून महिलेवर कोयत्याने वार, आरोपीला शिक्षा

arrest
एकतर्फी प्रेमातून महिलेवर धारधार कोयत्याने वार करून तिची हत्या करण्याच्या धक्कादायक प्रकार पुण्याच्या कल्याणीनगर भागात घडला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करून न्यायालयाने त्याला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि 6 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
 
हे प्रकरण पुण्यातील  कल्याणीनगरच्या एका सोसायटीतील आहे. या सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेवर 22 मार्च 2016 रोजी एकाच सोसायटीत काम करणाऱ्या  आरोपीने कोयत्याने हल्ला केला या बाबत तिने येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी अरुणकुमार राजकुमार साहूच्या विरोधात तक्रार नोंदवली. 
 
22 मार्च 2016 रोजी कल्याणीनगरच्या एका सोसायटीत राहणाऱ्या महिलेची ओळख तिथेच राहणाऱ्या आरोपी अरुणकुमार याच्याशी झाली. घटनेच्या दिवशी महिला काम आटोपून घरी जात असताना आरोपी अरुणकुमार याने तिला वाटेतच अडवले आणि म्हणाला " तुझा नवरा तुझा नीट सांभाळ करत नाही, तू माझ्याशी लग्न कर यावर महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला. यावरून आरोपी म्हणाला तुला संपवतो म्हणत कोयत्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.

या प्रकरणी तिने येरवडा पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार केली .पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने दहा वर्ष सक्त मजुरी आणि 6 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit