गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (16:10 IST)

एकतर्फी प्रेमातून तरुणीला चौथ्या मजल्यावरून फेकले, आरोपीला अटक

arrest
प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून तिचा जीव घेण्याची धक्कादायक घटना दिल्ली जवळच्या नोएडा येथे घडली आहे. प्रेमाला नकार दिल्यावरून या माथेफिरू तरुणाने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले आणि मृतदेह घेऊन पळ काढला. शीतल(22)रा. होशियारपूर असे या मयत तरुणीचे नाव आहे. तर माथेफिरू आरोपी गौरव हा विवाहित असून त्याचे शीतल वर एकतर्फी प्रेम होते. तो शीतलला खूप त्रास द्यायचा. त्याचा त्रासाला कुटुंबीय कंटाळले होते. शीतलच्या कुटुंबीयांनी गौरवाची तक्रार पोलिसात देखील केली होती तरी ही पोलिसांनी काहीही दखल घेतली नाही.तर गौरवला समजावून सोडून दिले. 
 
शीतलच्या भावाने सांगितले की, त्याची बहीण शीतल ही होशियारपूरमधील शर्मा मार्केटमध्ये विमा कंपनीत काम करत होती आणि आज गौरव तिच्या मागे गेला. शीतलने तिचा प्रेमप्रस्ताव फेटाळल्यानंतर गौरवने तिला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. त्यानंतर तो खाली आला आणि स्वत: शीतलचा भाऊ असल्याचे सांगून हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या नावाखाली तिचा मृतदेह कारमध्ये नेला. 
 
दरम्यान, चौथ्या मजल्यावरून मुलगी पडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला, तेव्हा कुटुंबीयांनी गौरव हा मुलीचा भाऊ नसून एक माथेफिरू प्रियकर असल्याचे सांगितले, जो तिला सतत त्रास देत होता. नोएडाच्या रुग्णालयात बराच शोध घेऊनही मुलगी सापडली नाही, तेव्हा पोलिसांनी गौरवचा मोबाइल पाळत ठेवला आणि नंतर तिला मेरठ कंकरखेडाजवळ एका रुग्णवाहिकेत मृतदेहासह पकडले. गौरवने सांगितले की, शीतलचा मृतदेह बिजनौरला नेऊन जाळण्याचा त्यांचा प्लान होता. त्याने मुलीशी लग्न केल्याचे सांगितले. आता ती त्याच्यापासून दूर जात होती, त्यामुळे तिने हे पाऊल उचलले. आरोपी गौरवला अटक करण्यात आली. 
Edited by - Priya Dixit