1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Kolhapur Brutal murder of young woman due to one-sided love accused arrested

Kolhapur: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर अत्याचार करून निर्घृण हत्या,आरोपीला अटक

कोल्हापुरातून एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 
सदर घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील असून एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचे मृतदेह ओढ्याकाठच्या झुडपात फेकून दिले.पोलिसांनी या प्रकरणात सनी अरुण कांबळे याला अटक केली आहे.

सनी हा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस असून एकतर्फी प्रेमातून हे कृत्य घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले असून अहवालात तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी संशयित आरोपी सनीला अटक केली असून त्याची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे कोल्हापूर हादरलं आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit
 
पुढील लेख
Shahid Afridi: दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या बहिणीचे निधन