Kalyan : बस चालकावर कोयत्याने हल्ला,आरोपीला अटक
भर रस्त्यात एका माथेफिरूने बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या रामबाग परिसरात गुरुवारी सायंकाळी घडली आहे.
गुरुवारी 8 :30 च्या सुमारास कल्याण पश्चिम रामबाग परिसरात एका माथेफिरूने केडीएमटीची बस अडवून चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि दोन बसची तोडफोड केली. कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्नाचा प्रतिकार केल्यावर या माथेफिरूने पाठीमागून येणाऱ्या दोन बसच्या काचा फोडल्या.
बस चालक आणि वाहकाने माथेफिरुला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बाळू साबळे असे या माथेफिरू हल्लेखोराचे नाव असून त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी त्याला सोडून गेल्यामुळे तो मानसिक तणावात होता. या मुळे त्याने हे कृत्य केले. घटनेची माहिती मिळतातच महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि बस चालक आणि बस वाहकाने धाडसाने या माथेफिरूंवर ताबा घेत पोलिसांच्या ताब्यात दिलं.पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
Edited by - Priya Dixit