रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (14:33 IST)

नांदेडमध्ये ऑनर किलिंग; वडील आणि भावांकडून डॉक्टर मुलीची निर्घृण हत्या,आरोपींना अटक

murder
नांदेड जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी ऑनर किलिंगची घटना जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे घडली आहे. मुलीच्या प्रेमामुळे संतापलेल्या वडील, भाऊ आणि मामांनीच मुलीची हत्या केली आणि गुपचूप मृतदेह जाळून टाकलं. शुभांगी जोगदंड (23)असे मुलीचे नाव असून, ती BHMS च्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती.
 
शुभांगी ही BHMS च्या तिसऱ्या वर्षांत शिकत असून तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. कुटुंबीयांना त्यांचं नात मान्य नव्हतं. यानंतर घरच्यांनी तिचं दुसरीकडे लग्न जुळवलं, पण तिनं हे लग्न मोडलं.
 
यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी झाली, या रागातून आरोपी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भावांनी मुलीला ठार मारलं.आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिला येतात जाऊन जाळून राख ओढ्यात फेकून दिली.तीन चार दिवसांपासून शुभांगी दिसली नाही त्यामुळे गावातील लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केल्यावर ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी, कृष्णा आणि गोविंद असे पाच जणांना अटक केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit