1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (15:50 IST)

शेतात सापडलेल्या ८ वर्षीय मुलीच्या खुनाचा उलगडा; अल्पवयीन आरोपीस अटक

crime
भंडारा : जिल्ह्याच्या साकोली तालुक्यामधील पापडा इथल्या ८ वर्षीय श्रद्धा सिडाम खून प्रकरणाचा पोलिसांना अखेर सुगावा लागला आहे. अत्याचाराच्या प्रयत्ना दरम्यान तोंड दाबल्याने श्रद्धाचा गुदमरुन मृत्यू झाला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तनसाच्या ढिगाऱ्यामध्ये मृतदेह जाळल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी घराशेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेषबाब म्हणजे, यापूर्वी संशयाच्या आधारावर अटक केलेल्या आरोपीचा या गुन्हामध्ये कोणताही समावेश नसल्याचे समोर आले आहे.
 
अधिक माहितीनुसार, श्रद्धा ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेत निवडणुकीच्या संदर्भात बैठक होणार असल्याने शाळा लवकर सोडण्यात आली होती. यामुळे २८ नोव्हेंबरला ती शाळेमधून आल्यावर आई घरी न दिसल्याने आईच्या शोधात शेजारी रहात असलेल्या आरोपीच्या घरी आईला शोधायला गेली. आरोपीच्या घरी कुणीच नव्हते त्याने मुलीला घरामध्ये नेत संधीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्याच्या प्रयत्न केला. यावेळी आरोपीने श्रद्धाचे तोंड दाबल्याने तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor