1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (08:22 IST)

भंडारा-प्रथम श्रेणी न्यायालयात जमानतदाराने चप्पल भिरकवली,आरोपीला अटक

Praveen Sitaram Waghmare (48) Res. The name of the accused is Sant Kabir Ward
रिकाम्या आसनाकडे एका जमानतदाराने चप्पल भिरकावल्याची घटना भंडारा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात शुक्रवारी घडली. चप्पल फिरकावणाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
 
प्रवीण सीताराम वाघमारे (४८) रा. संत कबीर वॉर्ड, भंडारा असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रथम श्रेणी न्यायालय क्रमांक १ मध्ये भादंवि कलम ३९५ च्या आरोपीची प्रवीणने गुरुवारी जामीन घेतली होती. मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जामीन घेण्यास नकार देत तो न्यायालयात पोहचला. दुपारी ४ वाजताच्या सुमारास प्रथम श्रेणी न्यायालयात न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे त्याने काही कळायच्या आत चप्पल भिरकावली. यामुळे एकच खळबड उडाली. तात्काळ भंडारा शहर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी न्यायालय गाठून आरोपी प्रवीण वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध भादंवि ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास भंडारा शहरचे ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.