शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (23:47 IST)

भंडाऱ्यात शिक्षकाकडून गोळी झाडून विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

crime
भंडारा शहरात वाचनालय येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्यांची शिक्षकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.अतुल बाळकृष्ण वंजारी(30) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याला ठार मारणाऱ्या आरोपी शिक्षकाचे नाव गंगाधर नारायण निखारे असे आहे. आरोपी गंगाधर हा तासिका तत्वावर शिक्षक असून शिकवणी घेत होता. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अतुल हा प्रकल्पग्रस्त असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालय हेडगेवार चौक येथे शनिवारी दुपारी अभ्यास करत असताना आरोपी गंगाधर आला आणि देशी कट्ट्यातून अतुलच्या पाठीवर गोळी झाडली. अतुलला काही समजेल तो पर्यंत आरोपीने गोळी झाडली त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला अतुलला तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आरोपी पळून जाण्यापूर्वीच तिथे असलेल्या लोकांनी त्याला पकडले आणि घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अतुल आणि आरोपी मध्ये अतुल आरोपीच्या घरात राहत असल्यापासून वादावादी होती. आरोपी गंगाधर हा एका महाविद्यालयात तासिका तत्त्वावर भौतिक शास्त्र शिकवायचा.आरोपीशी मयत अतुलचे वाद असल्यामुळे आरोपीने त्याचा खून केला.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.