गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:32 IST)

महिला पोलिसांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न,आरोपीला अटक

arrest
मुंबईतील नालासोपारा परिसरात एका वकिलाचे नो पार्किंग झोन मध्ये लावलेले वाहन वाहतूक पोलिसांनी उचलल्यामुळे वाहतूक महिला पोलिसांवर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात महिला पोलीस गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी वकिलाला अटक  करण्यात आली आहे. ब्रजेश भेलोरिया असे या वकिलाचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायाने वकील असणाऱ्या ब्रजेशची मोटारसायकल  नो पार्किग झोन मध्ये उभी असताना वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांची मोटारसायकल उचलून नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क येथील वाहतूक शाखेच्या गोदामात नेऊन ठेवली. सोमवारी दुपारी ब्रजेश आपल्या पत्नीसह आला आणि आपली बाईक बळजबरीने नेण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मी प्रज्ञा दळवी त्यांनी ब्रजेशला गाडी नेण्यापासून अडवलं गाडी चा दंड भरून गाडी न्यावे असे त्या म्हणाल्या .तरीही आरोपी ब्रजेश त्यांच्याशी हुज्जत घालू लागला आणि त्याने थेट मोटारसायकली महिला पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकरणात प्रज्ञा याना हातापायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना विरारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि आरोपी ब्रजेशला अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. .