1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (21:21 IST)

विजय ताड यांच्या हत्येचा उलगडा; आरोपींना कर्नाटकातून अटक

arrest
सांगली जिल्ह्यातील जतमधील माजी भाजप नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येचा उलघडा झाला आहे. विजय ताड यांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्याच नगरसेवकाने ताड यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी थेट बेळगावातून चौघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
माजी भाजप नगरसेवक उमेश सावंत यानेच हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. या खुनाचा मुख्य सूत्रधार भाजपचाच माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचे समोर आले आहे. मात्र, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला? ते स्पष्ट झाले नसल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. खून करणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.
 
प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संदीप चव्हाण, निकेश मदने, आकाश व्हंनखंडे, किरण चव्हाण यांना कर्नाटकातून अटक केली आहे. तर उमेश सावंत फरार आहे. उमेश सावंत हे भाजपचे नगरसेवक आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्य आरोपी उमेश सावंत यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आली आहे.
 
सांगली जिल्ह्यातील जतचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्यावर शुक्रवारी गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी माजी नगरसेवक उमेश सावंत यांचे नावही तक्रारीमध्ये होते. मृत विजय ताड यांचे भाऊ विक्रम ताड यांनी याप्रकरणी तक्रार दिली होते. विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंत यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता, असे फिर्यादित नमूद करण्यात आले होते.
 
त्यामुळे विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष होता हे समोर आलं आहे. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना केली आहेत
Edited by : Ratnadeep Ranshoor