रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (15:27 IST)

कुटुंबाला पाण्यात ढकलत पतीची आत्महत्या

crime
कोल्हापूर येथे एका धक्कादायक घटनेत एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाला पाण्यात ढकलत स्वत: देखील आत्महत्या केली आहे.
 
ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगवडेवाडी येथे घडली आहे. या घटनेत पतीने आपल्या पत्नी, मुलगी आणि मुलाची हत्या केली. सुदैवाने या घटनेत मुलगी बचावली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या कालव्यात पतीने आपल्या कुटंबाला ढकलून दिलं आणि स्वत: कर्नाटकात येथे जाऊन आत्महत्या केली. संदीप अण्णासाहेब पाटील असे आरोपीचे नाव असून कालव्यात पत्नी राजश्री संदीप पाटील, मुलगा सन्मित संदीप पाटील आणि मुलगी श्रेया यांना ढकलून देण्यात आलं होतं. 
 
मुलीला पोहता येत असल्याने ती बचावली. मुलीला शुद्ध आल्यावर तिने दिलेल्या जबाबनुसार प्रकरण उघडकीस आले. दरम्यान संदीप पाटील यांनी एवढं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं हे अद्याप समजू शकलेलं नाही तर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.