रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (08:18 IST)

कसबा पोटनिवडणूक, रवींद्र धंगेकर कसबा गणपतीसमोर उपोषण करणार कारण

ravindra dhingekar
Twitter
कसबा पोटनिवडणुकीतले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज (25 फेब्रुवारी) गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. विरोधी उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ते उपोषण करणार असल्याचं 'सकाळ'ने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
 
पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते, पदाधिकारी हे लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला असून ही लोकशाहीची हत्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
धंगेकर हे परभवच्या उंबरठ्यावर आहेत आणि त्यांनी केलेला आरोप हा हास्यास्पद आणि निषेधार्य आहेत. पोलिसांचे नाव घेऊन पैसे वाटण्याचा काम सुरू आहे, हे सांगणे म्हणजे सहानभुती मिळवण्याचा प्रकार आहे, असं भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी म्हटलं आहे.