शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (20:57 IST)

रुपाली ठोंबरे पाटील अतिशय भांडखोर आहे -- शरद पवार

rupali patil
रुपाली ठोंबरे पाटील या राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या मानल्या जातात. रुपाली ठोंबरे या माजी नगरसेविका आहेत. शरद पवार यांना रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबद्दल विचारले असता, ती अतिशय भांडखोर आहे असे ते म्हणाले. शरद पवार यांनी असे बोलताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. शरद पवारही मनसोक्त हसायला लागले. शरद पवार एखाद्या व्यक्तीचे नाव घेतात आणि त्या व्यक्तीचा स्वभाव सांगतात. त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

त्याच्याकडे एक जबरदस्त स्मरणशक्ती आहे आणि विशिष्ट शब्दांमध्ये व्यक्तीचे अतिशय समर्पक वर्णन करण्याची हातोटी आहे. शरद पवार यांना रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत विचारले असता, उपस्थित पत्रकारांनी शरद पवारांचा तोच स्वभाव अनुभवला.
 
रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत आज शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? असे शरद पवार म्हणाले, त्यानंतर पत्रकाराने रुपाली ठोंबरे पाटील असे म्हटल्यावर शरद पवार चटकन म्हणाले की, ती खूप भांडखोर आहे, पोलिस बोलू लागले तरी ती थेट त्यांच्या अंगावर जाते.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor