रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (20:34 IST)

संजय राऊत यांचं आडनाव आता नामांतर करुन संजय आगलावे असं नाव ठेवा

sanjay raut
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला मला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर विविध नेत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
 
"संजय राऊत यांचं आडनाव आता बदलण्याची वेळ आली आहे. त्यांचं नामांतर करुन संजय आगलावे असं नाव ठेवायला हवं. ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एका निष्पाप, प्रमाणिकपणे चांगलं काम करणाऱ्या तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदे यांच्यावर असे आरोप करत आहेत. असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊत यांनाच काय, तर कुणालाच शोभणारं नाही. बेभान झालेले संजय राऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील याचा काही नेम राहिलेला नाही", असं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.

Edited By-Ratnadeep Ranshoor