1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (16:11 IST)

कणेरी मठात 53 गायींचा मृत्यू

3 cows died in Kaneri Math
कोल्हापूरातील कणेरी मठाजवळ असलेल्या गोशाळा येथील 52 गायी दगावल्या असल्याची बातमी समोर आली आहे. रिपोट्सप्रमाणे शिळे अन्न खायला दिल्याने या गायींचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे।
 
कोल्हापूरातील कणेरी मठावरील पंचमहाभूत महामंगल सोहळ्याला येथे लोकांची ये जा सुरू आहे. 21-23 फेब्रुवारी दरम्यान या सोहळ्यामध्ये अनेक प्रजातीच्या गायी म्हशीं, बकर्‍या, घोडे, गाढवं, मांजरी आणि कुत्री यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
 
या सोहळ्यात जनावरांच्या विविध गटांत स्पर्धा देखील आयोजित केल्या गेल्या होत्या. दरम्यान लोकांसाठी बनवलेले अन्न जास्त प्रमाणात वाया जात असताना हे उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घातल्याने कदाचित विषबाधेतून गायींचा मृत्यू झाल्याची चर्चा रंगली आहे.

photo: symbolic