हसन मुश्रीफांच्या ईडी कारवाईवर किरीट सोमय्या यांनी केलं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मागील महिन्यात आयकर विभाग तसेच ईडीने छापेमारीची कारवाई केली होती. त्यात आता माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर वेगवेगळे घोटाळ्यांचे आरोप केले आहेत.
कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर मागील महिन्यात आयकर विभाग तसेच ईडीने (ED) छापेमारीची कारवाई केली होती. त्यात आता माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर वेगवेगळे घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. त्यांनी जर बँकेकडून काही चुका झाल्या तर त्या आरबीआयकडून दुरुस्त केल्या जातील. हसन मुश्रीफ आणि परिवार, कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. सध्या वेगवेगळ्या दिशेने तपास जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात आलेल्या किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, बँकेची नव्हे तर मुश्रीफ यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाशी आणि मित्रपरिवारशी संबंधित आर्थिक व्यवहाराची ही चौकशी सुरु आहे. केडीसी बँक मजबूत राहणार आहे. ठेवीदाराची रक्कम सुरक्षित राहणार आहे. एका व्यक्तीने घोटाळा केला आणि त्याची चौकशी लागली तर ती बँकेची चौकशी नव्हे, त्या व्यक्ती संबंधित आहे. जर बँकेकडून काही चुका झाल्या तर त्या आरबीआयकडून दुरुस्त केल्या जातील. हसन मुश्रीफ आणि परिवार, कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. सध्या वेगवेगळ्या दिशेने तपास जात आहे.
Edited by-Ratnadeep Ranshoor