1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (21:27 IST)

सत्तासंघर्षावर आता पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला

uddhav eaknath shinde
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनवणी संपली. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तीन दिवस झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करत अनेक कायदेशीर मुद्दे कोर्टात मांडण्यात आले.
 
राज्याच्या सत्तासंघर्षात सलग तीन दिवस युक्तिवाद झाला. मात्र, अद्यापही फक्त ठाकरे गटाचाच युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही 28 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. यावेळी ठाकरे गट आपला युक्तिवाद पूर्ण करेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची बाजू मांडण्यात येईल. 
 
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर 21 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू असलेली सुनावणी  संपली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तिनही दिवस ठाकरे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला होता. विशेष म्हणजे याच आठवड्यात सुनावणी जारी राहील असे सर्वांना वाटत होते. परंतु, सरन्यायाधीशांनी अचानक सुनावणी पाच दिवस पुढे ढकलून 28 फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित केले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor