सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (13:27 IST)

Video उदयनराजेंनी गायलं बॉलीवूडचं गाणं

सातारा- भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज 57 व्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील गांधी मैदानावर सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांचा 'जल्लोष गाण्यांचा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. तेव्हा रोहित राऊतच्या आग्रहानंतर उदयनराजेंनी देखील गाणं गायलं.
 
राज्यात उदयनराजे यांचा मोठा चाहता वर्ग  असून अनेकदा बघण्यात आले आहे की ते आपल्या समर्थकांचा तसेच चाहत्यांचा आग्रह फारसे मोडत नाहीत. यावेळी देखील गाणं गाण्याबाबत चाहत्यांनी हट्ट धरला तर त्यांनी तो प्रेमाने मान्य केला.
 
उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम दरम्यान गायक रोहित राऊत स्टेजवरुन खाली उतरले आणि त्यांनी उदयनराजेंच्या गाण्याचा आग्रह धरला. यावेळी उदयनराजेंनी बॉलीवूडचं गाणं "तेरे बिना जिया जाये ना" हे गाणं गायलं आणि चाहत्यांना त्यांना ऐकण्याची संधी मिळाली.
 
चाहते प्रचंड उत्साहात दिसत होते. त्यांनी तेरे बिना... हे गाणं आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी समर्पित असल्याचे सांगितले.