बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (08:37 IST)

पुण्यात मनसेला मोठे खिंडार; ५० जणांचे राजीनामे

maharashatra navnirman sena
राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला दावा आणि कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार यामुळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे.
 
महाविकास आघाडीकडून वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण नेत्यांपर्यंत सर्वच नेते या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आमदार रोहित पवार, नाना पटोले, अजित पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी भाजपचे नेते जोमाने प्रचार यात्रेत उतरले आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. यातच मनसेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. यामुळे ५० जणांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे.
Edited by-Ratnadeep Ranshoor