1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (08:49 IST)

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील १२ कलावंतांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यात

महाराष्ट्रातील 12 कलावंताचा समावेश आहे.
पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी   ‘अकादमी रत्न सदस्यता’  या संगीत अकादमीच्या  मानाच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.
      
यासह राज्यातून नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील त्यांच्या सर्वंकष योगदानासाठी गौरविण्यात आले. त्यांच्यासह लोक संगीतकार पांडुरंग घोटकर, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, कथक नृत्यांगना शमा भाटे, दिग्दर्शक कुमार सोहोनी, कळसूत्रीकार मीना नाईक, सुगम संगीत गायक अनूप जलोटा, सतारमेकर मजीद गुलाबसाहेब, ओडिसी नर्तक रबिंद्र कुमार अतिबुद्धि आणि समकालीन नर्तक भुषण लकंद्री  यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आज गौरविण्यात आले.
 
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या. 

Edited by-Ratnadeep Ranshoor