रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (14:32 IST)

Video विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात एक घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसवून दर्यापूर जात असलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने 22 विद्यार्थी जखमी झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर जैनपूर येथे सुरू होते तसेच शिबीराचा समारोप झाल्यानंतर चक्क विद्यार्थ्यांना एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसवून दर्यापूर घेऊन जात असताना अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाली व यात 22 विद्यार्थी जखमी झाले. अपघातातील दोघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.