Pune Bus Accident महामार्गावर बसचा भीषण अपघात, दोन महीलांचा मृत्यू, 30 जखमी
Pune Bus Accident पुणे महामार्गावर बसचा दौंड तालुक्यातील पाटस येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर असून 30 प्रवाशी जखमी झाल्याची बातमी आहे. सत्याभामा बोयने आणि श्वेता पंचाक्षरी अशी मयतांची नावे आहेत तर बाळासाहेब शिरखाने हे गंभीर जखमी आहेत.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास पुणे सोलापुर महामार्गाने लातुरहुन पुण्याकडे जाणारी बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असणार्या सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला.
याबाबत पाटस पोलिस चौकीहून मिळालेल्या माहितीनुसार लातुरहुन एक बस पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने पुण्याकडे जात असताना दौंड तालुक्यातील पाटस घाटात रस्त्यात बंद पडलेल्या सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला धडकली. अपघातात बसच्या डावीकडील भागाचा चुराडा झाला. यावेळी दोन महीला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले त्यापैकी एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी नागरीकांच्या मदतीने बसमधील जखमी व्यक्तींना तत्काळ बाहेर काढुन उपचारासाठी पाठवण्यात आले तर मृत व्यक्तींना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.