1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 11 passengers injured in bus accident returning from pilgrimage

यात्रेहून परत येणाऱ्या बस अपघातात 11 प्रवासी जखमी

accident
येरमाळा येथून येडेश्वरी देवीच्या यात्रेतून परतताना पुणे- सोलापूर महामार्गावर मळद गावाच्या हद्दीत एका खासगी प्रवासी बसला टेम्पोने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या खासगी बस मध्ये एकूण 31 प्रवासी होते. या अपघातात पुण्यातील भवानीपेठेतील 11 भाविक गम्भीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस   घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल केले.   

Edited By - Priya Dixit 
पुढील लेख
IPL 2023 DC Vs RR : : यशस्वी जैस्वाल आणि बटलरचा गुवाहाटीत हल्लाबोल