शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (11:23 IST)

अजित पवार नॉट रिचेबल ?

ajit pawar
महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजित पवार काल पुण्याच्या कार्यक्रमानंतर अचानकपणे नॉट रिचेबल झाले. त्यानंतर सर्वत्र पुन्हा एकदा राज्यात सत्ता समीकरण पलटणार असल्याचे चर्चा रंगू लागले.
 
 यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत सततचे दौरे, जागरण यामुळे मला पित्ताचा त्रास झाला होता, त्यामुळे औषध घेऊन विश्रांती घेत होतो असं सांगितलं.  पण अजित पवार हे कोणत्या राजकीय कारणामुळे नॉट रिचेबल झाले आहे का, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अजित पवार आणि पक्षातील 7 आमदार नॉट रिचेबल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.