शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (14:02 IST)

हिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय आहे तेथे

mumbai
राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय आहे तेथे सोबतच वाचा  राज ठाकरे काय बोलले माहीमच्या जागेबद्दल
 
मशिदीवरील भोंग्याच्या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुंबईतल्या माहीम समुद्र किनाऱ्याच्या आतमध्ये अनधिकृत मजार बांधली गेल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.  जाहीरसभेमध्येच राज यांनी मजारचा व्हिडीओ दाखवला असून महिन्यात हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली आहे. जर हे काम तोडलं नाहीतर तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू, जे होईल ते होईल, असा कडक इशाराच  राज ठाकरेंनी दिला.
 
'हे इथं असलेल्या मगदूनबाबाच्या समोर, अनधिकृत मजार बांधली जात आहे. दोन वर्षांमध्ये हे उभं केलं आहे, लोकांचं लक्ष नाही. महापालिकेचे लोक फिरतात, पाहिलं नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करणार, आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त आजच सांगतो, महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं नाही, त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग  काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. 
 
प्रशासनच दुर्लक्ष असल्याने काय घडू शकतं, हे चित्र मी दाखवत आहे. जे या देशातील घटना माणणारे मुसलमान आहे त्यांना आहे मान्य आहे का? हे व्हिडिओ दाखविल्यानंर सरकारने कारवाई करत नसेल तर महिन्याभरात काय होईल मला माहीत नाही. माहीम जवळील समुद्रातील व्हिडीओ दाखविले आहे. ज्यावर मजार बनविले आहे, असा सवालही राज ठाकरेंनी केला.
 
कुणी यावं आणि टपल्ली मारून जावं, हे राज्यात चालणार नाही. माझ्या हातात सत्ता दिली तर सुता सारखं सरळ करून टाकेन. तुमच्या डोळ्या देखत घडले. आम्ही राजकारणात गुंतलो आहे. जसा मुस्लिम समाज आहे, त्याला तरी मान्य आहे का. कुणाची समाधी आहे, माशाची समाधी आहे का? हे लोक म्हणाले, पेंग्विन...पण राजकर्ते दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतलेले असतात, त्यासाठी हा स्क्रिन लावला होता. येणारी रामनवमी जोरात साजरी करा, येत्या 6 जूनला शिवरायांच्या राज्यभिषेकला 350 वर्ष होणार आहे, मी स्वत: रायगडाला जाणार आहे. तुम्ही सुद्धा या. बेसावध राहू नका, पाळत ठेवा, आज बेसावध राहिला तर जमीन निघून जाईल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात विरोधीपक्षासह सत्ताधाऱ्यांनाही लक्ष्य केलं. यावेळी राज ठाकरेंनी एक व्हिडिओ सर्वांना दाखवत सरकारकडून कशापद्धतीनं राज्यात काय चाललंय याकडे दुर्लक्ष असल्याचं दाखवून दिलं.
राज ठाकरेंनी यावेळी मुंबईतील माहिमच्या समुद्रात सुरू असलेल्या अनधिकृत वास्तूचा व्हिडिओ दाखवला. हे व्हिडिओ फुटेज ड्रोनच्या माध्यमातून शूट करुन घेतल्याचं राज यांनी यावेळी सांगितलं.
mumbai
"एकेदिवशी सहज माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर काही माणसं पाण्यातून चालताना दिसली. मग मी एकदा तिथं नेमकं काय आहे हे एकाला पाहायला सांगितलं. मग माझ्याकडे या संपूर्ण परिसराचं ड्रोन फुटेज आलं आणि त्यात जे दिसतंय त्यातून प्रशासनाचं किती दुर्लक्ष आहे हे लक्षात येतं", असं राज ठाकरे म्हणाले.
 
राज ठाकरे यांनी व्हिडिओ फुटेजमध्ये दाखवलेली ती जागा माहिमच्या समुद्र किनाऱ्या लगतची आहे. भरतीच्या वेळी ती अशी पाण्याखाली जाते.
 
सदर ठिकाणी लावण्यात आलेला एक झेंडा यात पाहयला मिळतोय.
 
ओहोटीच्या वेळी जागेचं संपूर्ण रुप इथं पाहायला मिळतं. याठिकाणी एक कबर बनवण्यात आलेली असल्याचंही दिसून येतं आहे.
 
कबरीच्या शेजारीच दोन झेंडेही फडकवण्यात आले आहेत. तसंच कबरीला हार-फुलांनी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
 
आता ही कबर नेमकी कुणाची? आणि ती अशी समुद्रात का बांधली गेली? परवानगी कुणी दिली? याची काहीच माहिती अद्याप कळू शकलेली नाही.पण या कबरीचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण तिथं येत असतानाचंही व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे.
 
हळूहळू याठिकाणी हाजीअली सारखा दर्गा उभारला जाईल अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केलीय. तसंच हे बांधकाम दोन वर्षात झालं असल्याचाही दावा केला आहे.
 
काही माणशं या कबरीच्या दिशेनं पाण्यातून वाट काढत चालत येतानाही पाहायला मिळतात.हिच ती माहिमची किनारपट्टी जिथून जवळच एक दर्गा आहे आणि माहिम पोलीस ठाणे देखील आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor