सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (12:53 IST)

Pune: पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण

सध्या बाहेरून फास्टफूड मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरीबॉयला पिझ्झा उशिरा आणल्यामुळे बेदम मारहाण करत हवेत फायरिंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या वाघोलीत वाघेश्वर मंदिरा जवळ हा प्रकार घडला आहे. 
 
वाघोली परिसरात एका पिझ्झा सेंटर मध्ये रोहित राजकुमार हुलसुरे हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. मारहाण करणाऱ्या आरोपीने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करून  मागवला असून डिलिव्हरीबॉयने रात्री उशिरा पिझ्झाची डिलिव्हरी केली. या वरून संतापून आरोपीने डिलिव्हरी बॉय रोहितला बेदम मारहाण केली पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील इतरांनी जाब विचारत असताना सर्वांना दमदाटी करून बेदम मारहाण केली आणि पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. चेतन पडवळ असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी चेतनच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 
 
 

Edited by - Priya Dixit