गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (10:11 IST)

सरकारी कर्मचाऱ्याला घरात कोंडून बेदम मारहाण,आरोपीला अटक

A government employee  brutally beaten
हिंगोलीत सेनगाव तालुक्यातील खडकी गावात सरकारी कर्मचाऱ्याला घरात कोंडून बेदम मारहाण करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून मारहाण केल्याचे समजते. आरोपीला अटक करण्यात आली आहे.  रामकिसन हराळ असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते जिल्हापरिषदचे कर्मचारी आहे. जागेच्या वादातून त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर घटना सहा दिवसांपूर्वीची आहे.

पीडित रामकिसन यांना घरात कोंडून हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही मारहाण जमीनीच्या वादाच्या प्रकरणातून केल्याचे समजले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 

Edited By- Priya Dixit