शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 19 मार्च 2022 (16:26 IST)

पुढील दोन दिवसांत पुण्याचा तापमान ४१ अंश सेल्सिअस गाठणार

येत्या दोन दिवसांत वातावरणातील तापमान वेगाने वाढणार असून पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.
 
डॉ. साबळे म्हणाले, बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन वारे वाहण्यास सुरुवात होईल. त्याचे रूपांतर लहानशा चक्रीवादळात होईल. त्यानंतर हे चक्रीवादळ गुरुवारी अर्थातच २४ मार्च रोजी ब्रह्मदेशाकडे जाईल. अंदमान- निकोबार भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल. कोकणपट्टीत रविवार २० मार्च रोजी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसासाठी वातावरण तयार होईल. त्यामुळे काही भागात पाऊस होईल. तशीच स्थिती त्यापुढेही राहील.
 
महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. दुपारची व सकाळची आर्द्रता घटेल. राज्यात बऱ्याच भागात तापमान सरासरीपेक्षा ३.१ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहील. विदर्भ व मध्य महाराष्ट्रात अधिक तापमान राहील. किमान तापमान मात्र मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडे कमी म्हणजे १.६ अंश सेल्सिअस ते ३ अंश सेल्सिअसने कमी राहणे शक्य असल्याचे डॉ. सावळे यांनी सांगितले.