शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (21:50 IST)

होळीच्या सुट्ट्यांचा आनंद मुंबई जवळील या हिल स्टेशनला भेट देऊन घ्या

यंदा  होळी सण 18 मार्च (शुक्रवार) रोजी आहे आणि होलिका दहन 17 मार्च (गुरुवार) रोजी आहे. जर आपल्याला होळी खेळायला आवडत नसेल तर यावेळी  होळीच्या सुट्टीत  कुठेतरी जाण्याची योजना आखू शकता. जेणे करून आपला  कामाचा ताणही कमी होईल आणि मेंदू आणि मनही ताजेतवाने होईल. अशा परिस्थितीत,आपण फिरण्यासाठी मुंबईला लागून असलेल्या अनेक हिल स्टेशनचा समावेश करू शकता. महाराष्ट्रात असलेली ही हिल स्टेशन्स  उन्हाळ्याच्या हंगामात थंडपणासह सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यास मदत करतील. मुंबई जवळ काही हिल स्टेशन्स असे आहेत,ज्या ठिकाणी आपण होळीच्या वीकेंडला जाऊन चांगला वेळ घालवू शकता. चाल तर मग जाणून घेऊ या.
 
1 लोणावळा- लोणावळा हे महाराष्ट्रचे अतिशय प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे मुंबईपासून 96 किलोमीटर अंतरावर आहे. लाँग वीकेंड वॉकसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. येथे धबधबे, तलाव, जंगले, धरणे, गुहा तसेच अनेक मंदिरे पाहू शकता. लोणावळ्यात  लोणावळा तलाव, पवना डॅम , भूशी डॅम, लोहागड किल्ला, राजमाची पॉइंट, लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट, नारायणी धाम मंदिर, कार्ला लेणी, भाजा लेणी, इमॅजिका, सनसेट पॉइंट आणि ड्यूक्स नोज पॉइंट तसेच आंतरराष्ट्रीय वेक्स संग्रहालय. बघू  शकता. होळीच्या वीकेंडला लोणावळ्यात जाण्याचा बेत आखू शकता.
 
2 पाचगणी- हे मुंबईपासून सुमारे 285 किमी आणि पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे, पाचगणी हिल स्टेशन त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पाचगणीत झाले आहे. येथे  टेबल लँड, डेविल्स किचन, राजपुरी लेणी, पारसी पॉइंट, कमलगड किल्ला, सिडनी पॉइंट, धोम धरण आणि मॅप्रो गार्डनला भेट देऊ शकता. होळीच्या वीकेंडला या ठिकाणी भेट देणं एकदम परफेक्ट आहे.
 
3 महाबळेश्वर- मुंबईपासून सुमारे 64 किमी अंतरावर, महाबळेश्वर हिल स्टेशन उंच टेकड्यांवर वसलेले आहे.  भेट देण्यासाठी येथे बरेच पॉईंट्स आहेत. येथे नैसर्गिक सौंदर्यासोबतच  प्राचीन मंदिरे, सनराईज आणि सनसेट पॉईंट्स, तलाव आणि धबधबे पाहायला मिळतील. येथे  विल्सन पॉइंट, बॅबिंग्टन पॉइंट, महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, पाच नद्यांचा धबधबा, कृष्णाबाई मंदिर, मंकी पॉइंट, नीडल होल पॉइंट अशा सुंदर ठिकाणी फिरू शकता.
 
4 खंडाळा- हे देखील मुंबईला लागून असलेले एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जिथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. येथे उंच पर्वत, खोल सुंदर दऱ्या, तलाव आणि धबधब्यांची सुंदर दृश्ये पाहू शकता. राजमाची पॉइंट, कर्नाळा पक्षी अभयारण्य, तुंगा किल्ला, लायन्स पॉइंट, कुणे धबधबा, श्री नारायणी धाम मंदिर, डेला अॅडव्हेंचर्स पार्क, भूशी डॅम, अॅम्बी व्हॅली, भैरवनाथ मंदिर, एकविरा मंदिर आणि खंडाळा तलाव आणि इतर बरीच प्रसिद्ध पर्यटन स्थळे येथे बघण्यासारखे आहेत. 
 
5 माथेरान- मुंबईपासून सुमारे 110 किमी अंतरावर, माथेरान हे आठवड्याच्या शेवटी भेट देण्यासारखे एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा जाणवेल. त्याचबरोबर येथे असलेली सुंदर पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात.  येथे पाहण्यासारखे ऑलिंपिया रेसकोर्स, इर्शालगड किल्ला, चंदेरी गुहा, पॅनोरमा पॉइंट, कॅथेड्रल पार्क, शार्लोट लेक, पेमास्टर पार्क आणि रामबाग अशी काही पर्यटन स्थळे आहेत.