महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून इयत्ता दहावी बारावीच्या 2025 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर
इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या 2025 परीक्षेच्या संभाव्य तारखा राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहे. आगामी वर्षात 2025 इयत्ता 10 वी ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 सुरु होणार आणि 17 मार्च 2025 रोजी संपणार आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 रोजी सुरु होणार आहे आणि 18 मार्च 2025 ला संपणार. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी होणार तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन 24 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या बाबत माहिती दिली आहे.
पुणे, नागपूर, अमरावती, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोकण आणि लातूर या नऊ विभागात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा मार्चच्या पहिला आठवड्यात तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येते.
तर 10 वी चा निकाल जून महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात आणि 12 वी चा निकाल मे च्या अखेरीस जाहीर होतो. तर जुलै -ऑगस्ट मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येते.
विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येऊ नये, अभ्यासक्रम वेळीच पूर्ण व्हावा,अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा.या साठी राज्य मंडळाकडून पुढील वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहे.
Edited by - Priya Dixit