1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2024 (10:02 IST)

12वीचा निकाल आज लागणार

result
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज म्हणजे मंगळवारी 21 मे रोजी  दुपारी 1 वाजता ऑनलाईन माध्यमातून जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी अशी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना या mahresult.nic.in संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल 
 
इयत्ता बारावीची परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आली असून निकालाबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. आता मंडळाने निकालाची तारीख जाहीर केली आहे. आता निकाल आज जाहीर होणार आहे. 
विद्यार्थी बुधवार पासून गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे ते 5 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील.
 
विद्यार्थ्यांनी उत्तरपुस्तिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करण्यासाठी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत घेणे अनिवार्य असेल. उत्तरपत्रिका मिळाल्याच्या पाच दिवसांत उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करावे. 
 
इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा जुलै -ऑगस्ट मध्ये घेतली जाणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थी सोमवार 27 मे पासून ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात.