1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Mega block on Pune-Mumbai Expressway for two days traffic in Pune closed

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दोन दिवस मेगाब्लॉक पुण्याची वाहतूक बंद

ex pressway
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील डोंगरगाव-कुसगाव परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे शटरिंग काढण्यासाठी आणि रंगकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून  दोन दिवसांचा गुरुवार आणि शुक्रवारी  विशेष ‘मेगाब्लॉक करण्यात आला असून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद राहणार आहे.
प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे 
पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी : ही वाहने कुसगाव टोल प्लाझामार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (जुना मुंबई-पुणे रस्ता) वर वळवली जातील. पुढे देहूरोड आणि किवळे मार्गे ही वाहने पुन्हा पुण्याकडे जाऊ शकतील.
मिसिंग लिंक प्रकल्पाच्या दृष्टीने हा उड्डाणपूल पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महामार्ग प्रशासनाने वाहनचालकांना या वेळेत प्रवासाचे नियोजन करण्याचे किंवा शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Edited By - Priya Dixit
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
होर्मुझवर नाकेबंदीआयआरजीसी सैनिकांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे डोनाल्ड ट्रम्पचे आदेश