रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 एप्रिल 2026 (22:51 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

Maharashtra Breaking News Live in Marathi 24 April
Marathi Breaking News Live Today: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) संघटनात्मक जबाबदाऱ्यांच्या विभागणीसंदर्भात सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या भूमिकेबाबत चर्चा तीव्र झाली आहे, मात्र पक्षाने हे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

मुंबईतील नेस्को रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या पार्टीत अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तपासात या प्रकरणाची सूत्रधार फरार असल्याचे उघड झाले आहे.

मराठा आरक्षणावरून राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. मनोज जारंगे पाटील यांनी उपसमितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ती बरखास्त करून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील डोंगरगाव-कुसगाव परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे शटरिंग काढण्यासाठी आणि रंगकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून  दोन दिवसांचा गुरुवार आणि शुक्रवारी  विशेष ‘मेगाब्लॉक करण्यात आला 

मराठा आरक्षणावरून राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे. मनोज जारंगे पाटील यांनी उपसमितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ती बरखास्त करून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली आहे.सविस्तर वाचा 

मुंबईतील दोन महिलांनी आयव्हीएफसाठीच्या वयोमर्यादेला आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय चाचण्या करण्याची परवानगी दिली आहे, परंतु अंतिम निर्णय तज्ज्ञांच्या मतावर आधारित असेल.

मुंबईतील नेस्को रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या पार्टीत अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तपासात या प्रकरणाची सूत्रधार फरार असल्याचे उघड झाले आहे. सविस्तर वाचा 

मुंबईतील दोन महिलांनी आयव्हीएफसाठीच्या वयोमर्यादेला आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय चाचण्या करण्याची परवानगी दिली आहे, परंतु अंतिम निर्णय तज्ज्ञांच्या मतावर आधारित असेल. सविस्तर वाचा 

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली असून, त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. सविस्तर वाचा 

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील डोंगरगाव-कुसगाव परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे शटरिंग काढण्यासाठी आणि रंगकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून  दोन दिवसांचा गुरुवार आणि शुक्रवारी  विशेष ‘मेगाब्लॉक करण्यात आला असून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद राहणार आहे. सविस्तर वाचा 

डोंबिवलीमध्ये परवडणाऱ्या घरांचे आश्वासन देऊन ६५ लोकांची अंदाजे ९३.८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी बिल्डरसह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

डोंबिवलीमध्ये परवडणाऱ्या घरांचे आश्वासन देऊन ६५ लोकांची अंदाजे ९३.८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी बिल्डरसह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.सविस्तर वाचा 

पुणे महानगरपालिकेतील होर्डिंग धोरणावरून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर हे धोरण तात्पुरते स्थगित करण्यात आले, ज्यामुळे प्रशासन आणि राजकारणात खळबळ उडाली आहे.

भिडे पुलाजवळ सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या गूढाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे उघड करत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. सविस्तर वाचा 

पुणे महानगरपालिकेतील होर्डिंग धोरणावरून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर हे धोरण तात्पुरते स्थगित करण्यात आले, ज्यामुळे प्रशासन आणि राजकारणात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा 

भाजपने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी ३० संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत पराभूत झालेले ज्येष्ठ नेते पुनरागमन करणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.सविस्तर वाचा 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वूड्स प्लाय कंपनीच्या परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजूर कुटुंबातील ११ महिन्यांची संध्या टेकम ही मुलगी पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मरण पावली. ती तिच्या वडिलांसोबत घरी असताना ही घटना घडली

महाराष्ट्रामध्ये ऑटो-रिक्षा चालकांसाठी मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक ऑटो-रिक्षा चालकाने मराठी बोललेच पाहिजे, हे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यांना वाचता-लिहिता येत नसले तरी बोलता येणे आवश्यक आहे.  सविस्तर वाचा 

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पौनी तालुक्यात सौंदडजवळ घडली. सविस्तर वाचा 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे..सविस्तर वाचा 

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वूड्स प्लाय कंपनीच्या परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजूर कुटुंबातील ११ महिन्यांची संध्या टेकम ही मुलगी पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मरण पावली. ती तिच्या वडिलांसोबत घरी असताना ही घटना घडली.सविस्तर वाचा 

मुंबईतील वरळी येथे भाजपच्या रॅलीदरम्यान एका महिलेचा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी वाहतूक कोंडीवरून वाद झाला आता तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही रॅली महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आली होती. सविस्तर वाचा 

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातल्या ओझरे गावात बुधवारी सायंकाळी एक दुःखद घटना घडली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या भिंतीचा काही भाग कोसळून एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा

आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तक वादावर माफी मागितली आहे. रोहित पवार यांच्या विरोधानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. सविस्तर वाचा

दहिसरमध्ये मनसेने संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला केला. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा 

अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विरोधात अघोरी पूजेचे खळबळजनक दावे करून खळबळ उडवून दिली आहे.  सविस्तर वाचा