शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (08:07 IST)

गाडी भाड्याने लावण्याचं आमिष दाखवत करायचा परस्पर विक्री, पोलीस आरोपीच्या मागावर

स्वतच्या वापरासाठी घेतलेल्या या आलिशान गाड्या जास्त भाडे मिळण्याच्या लालसेपोटी गाडी मालकांनी गाड्या भाड्याने घेण्यास सुरुवात केली. लोकांची लालच लक्षात घेत आरोपी सागर साबळे यांने पुणे जिल्ह्यातुन 500 पेक्षा जास्त गाड्या लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात असुन भोसरी, राजगुरुनगर, दौंड तालुक्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीसांनी 20 तर राजगुरुनगर पोलीस 23 गाड्या जप्त केल्या असुन, राजगुरुनगर पोलीसांची दोन पथके बीड जिल्हयात रवाना केली.
 
आरोपी सागर साबळे हा खेड तालुक्यातील साबळेवाडी गावचा माजी सरपंच असल्याने राजकिय पाश्वभुमीवरचा फायदा घेऊन ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांना जास्त भाड्याचे आमिष दाखवत औरंगाबाद आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये गाड्या भाड्याने लावुन महिन्याला २५ ते ३० हजार रुपये भाडे मिळेल असे आमिष दाखवून अनेकांच्या गाड्या ताब्यात घेऊन या अलिशान गाड्या परस्पर बिड जिल्ह्यात विक्री करत असे. यामध्ये गाडी मालकांसह गाड्या खरेदी करणार्यांची फसवणुक झाली.
 
गाडी व्यवसायातुन चांगलं उत्पन्न मिळेल या आशेपोटी अनेकांनी आलिशान गाड्या खरेदी केल्या. या गाड्यांवर बँका, फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेतले. या गाड्यांसाठी ड्रायव्हरची व्यवस्था साबळे हाच पाहणार होता. परिणामी गाडी प्रत्यक्षात कुठे वापरली जाणार याबाबत मालक अनभिज्ञ होते. अशातच सहा महिने उलटुनही भाडे मिळत नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आलं मात्र वेळ निघुन गेली होती. पोलीस आता या गाड्यांचा शोध घेत आहे.