शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:04 IST)

पुण्यात 29 वर्षीय शेतकरी महिलेवर सामूहिक अत्याचार

पुण्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 19 वर्षीय शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही महिला गोठ्यात गुरे बांधण्यासाठी गेली असताना दोघाजणांनी तिच्यावर बळजबरी करत सामूहिक अत्याचार केला. राजगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बांबवडे गावातील घटना घडली. पीडित महिला गोठ्यामध्ये गुर बांधत होती. त्या वेळी दोन आरोपी त्याठिकाणी आले आणि ही महिला एकटीच असल्याचे पाहून त्यांना गोठ्यामध्ये या महिलेवर सामूहिक अत्याचार केला. 10 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर या काळात हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
 
दरम्यान या महिलेने तक्रार दिल्यानंतर राजगड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे.