गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (09:17 IST)

T.V. मालिका पाहून पुण्यात अल्पवयीन मुलांकडून 70 वर्षीय महिलेचा खून

पुण्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात 14 आणि 16 वयाच्या दोन अल्पवयीन मुलांनी पैसे चोरण्यासाठी या महिलेचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
 
टीव्हीवरील एक मालिका पाहून पैसे चोरण्यासाठी या महिलेचा खून केल्याच दोन्ही अल्पवयीन मुलांनी मान्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय शालिनी सोनावणे यांचा खून करून पावणे दोन लाख रुपये दागिने चोरीला गेले होते. यासंदर्भातील कोणतेही सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध नव्हते.
 
तपास करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लहान मुलांशी चौकशी केली असता घटनेदिवशी आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी गेल्यानंतर आमचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच गडबडीने माघारी आले होते अशी माहिती दिली.
 
या दोघांची चौकशी पोलिसांनी सुरू केली. त्यांनी गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.