बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (09:14 IST)

गोव्यात पेट्रोल 12 आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच आणि दहा रुपयांची कपात केल्यानंतर गोव्याने अतिरिक्त सात रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे गोव्यात पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
 
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्यांना वॅट कर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गोवा सरकारने हा निर्णय घेतला.
 
काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारचा हा निर्णय जुमलेबाजी असल्याचं म्हटलं आहे.
 
काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल,डिझेलच्या उत्पादन शुल्कापेक्षा आताचे उत्पादन शुल्क तीन पटींनी अधिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तशी आकडेवारीच त्यांनी सादर केली.
 
देशात पोटनिवडणुकींच्या निकालात भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसून आलं. म्हणूनच मोदी सरकारने दरवाढीत कपात केली अशीही टीका केली जात आहे.