शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (09:07 IST)

सूर्याच्या 'जय भीम' सिनेमातील 'या' सीनवरुन वाद का?

तमीळ सुपरस्टार सूर्या याचा 'जय भीम' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील एका सीनवर आक्षेप घेतला जात असून तो हटवण्याची मागणी केली जात आहे.
 
2 नोव्हेंबरला 'जय भीम' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अभिनेते प्रकाश राज यांनी सिनेमातील एका सीनमध्ये हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली लगावली आहे. 'मला का मारले?' असा प्रश्न ती व्यक्ती विचारते. त्यावर प्रकाश राज यांनी 'तमिळमध्ये बोल' असे म्हटले आहे.
 
या सीनवरुन सोशल मीडियावर वाद-प्रतिवाद सुरू असून अशा प्रकारच्या सीन्सची सिनेमात गरज नाही असं मत अनेक यूजर्स व्यक्त करत आहे.
 
टी जे ज्ञानवेल यांनी या सिनेनाचं दिग्दर्शन केलं आहे.
 
दरम्यान, प्रकाश राज यांनी आपण या सिनेमाचा भाग असल्याचा आपल्याला अभिमान आहे असं म्हटलं आहे.