मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (15:27 IST)

मेट्रोमनी वेबसाईटच्या माध्यमातून भयंकर प्रकार, तरुणीला शरीरसुखाची मागणी केल्याचे आले फोन

मेट्रोमनी वेबसाईटवरील ओळखीनंतर त्यांची तीन वर्षे मैत्री होती. मात्र, त्याने दुसर्‍या मुलीबरोबर साखरपुडा केला. याबाबत या डॉक्टर तरुणीने विचारणा केल्यावर त्याने या तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल  तयार करुन त्यावर अश्लिल पोस्ट  टाकल्या. त्यामुळे या तरुणीला अनेकांनी फोन करुन शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
याप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात एका ३६ वर्षाच्या डॉक्टर तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुधांशु प्रदीपकुमार पारीख (वय ३७, रा. आदित्य रेसिडेन्सी, पिंपळे निलख) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भारत मेट्रोमनी या वेबसाईटवर लग्नाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरुन त्यांची आरोपीशी ओळख झाली. २०१६ ते २०१९ दरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्यात व्यवस्थित बोलणे चालू होते. फिर्यादीबरोबर बोलणी सुरु असताना आरोपीने दुसर्‍या मुलीसोबत साखरपुडा केला. त्याबाबत फिर्यादीने विचारणा केली. तेव्हा आरोपी व त्याच्या आईवडिलांनी फिर्यादी यांच्या क्लिनिकवर येऊन फिर्यादींना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी काम करीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये फोन करुन फिर्यादीची बदनामी केली. तसेच आरोपीने एका वेबसाईटवर फिर्यादीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार केली. त्यावर अश्लिल पोस्ट टाकल्या. त्यामुळे त्यांना अचानक अनेक अनोळखी लोकांनी फोन करुन त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.